ती सायंकाळची मंद वेळ
तो प्रेम पटाचा धुंद खेळ|

त्या लाघव्या बोलणी
ती लाजरी साजणी
त्या धुंद वाऱ्यावरी
उडणारी ओढणी

ती वादळी सांज होती
ती शब्दे ओठी होती||Couple watching sea storm weather

अजब किमया त्या नयनांची
सरीमधील त्या किरणांची

त्या घार्या चक्षु मधी
बुडून गेलो कधी
कळले ना हे मना
हारलो मी कधी

ती वादळी सांज होती
ती शब्दे ओठी होती||

अनवाणी त्या वाळुवारी
प्रेमाची ती बोली खरी

ते प्रेमाचे वचन
घायाळ होते मन
अन सरींमधले ते
निमभिजलेले तन

ती वादळी सांज होती
ती शब्दे ओठी होती||

त्या विश्वामधले ते दोघे
जगा कड़े मग कोण बघे

ते विरहा चे बंधन
न ऐके वेडे मन
परत भेटण्याचे
मग मिळते ते वचन

ती वादळी सांज होती
ती शब्दे ओठी होती||

मग रात्र जाते विचारत
स्वप्नातील ती तिचा हात

पुन्हा भेटाया मग
आतुर होते मन
जसा चातका लागे
पावसाचे कण

ती वादळी सांज होती
ती शब्दे ओठी होती||

Advertisements