जेव्हा तिचा फ़ोन येतो
घड्यळाला जोर येतो
आणि तिच्या आवजाने
जीवनाला मोहोर येतो

बोलायचे काही नाही तरी फ़ोन सुरु राही
दोघांचे ही मौन असे कमी पड़े शब्द जसे||

घड्याळाचे भान नाही
बिलाचा हिशेब नाही
पारव्यांच्या जोडप्याला
ग्रीष्माचाही त्रास नाही

रात्रीचा तो काहूर माजे
इकड़तिकडच्या चर्चा गाजे
खोटी प्रशंसा करताना मग
नकळत थोड़ी ती ही लाजे

रोज तिचा तो एक प्रश्न परतवशील का माझ हसन
तुझ्या परतीच्या भासामागे रोज च झालाय माझ फसन||

व्यक्तिगत जीवनाचे थोड़े
हताशाचे सुस्कारे सोडे
बोलताना मग निघते
मधुर आठवनीचे गोडे

आधी कसे त्या झाडाखाली
बोलण्याची ती विषय निराली
आता या अंतरा वरुनी
बोलण्याची ही वेळ आली

रात्रीचे ते दोन वाजे एका खोली तील दिवा जागे
दोन तासांच्या बोली नंतर पांच मिनट ती रोज मागे||

पांच मिनट चे होती तास
रात्रीचा तो श्रावण मास
मग पुन्हा झोपताना
तिच्या फ़ोन चा होतो भास्

Advertisements